
Instagram Video । सध्या अनेक जण instagram वर रील्स व्हिडिओ काढतात. व्हिडिओला Views मिळावेत यासाठी सध्याची तरुण पिढी अनेक वेगवेगळी कृती करताना आपल्याला दिसत आहे. मात्र काही जण आपल्या जीवाची परवा न करता अनेक धक्कादायक स्टंट करत असतात. सध्या देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका युवतीने धोका पत्करून प्रचंड धाडस केले आहे. (Social Media Video)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी झाडाच्या थेट टोकावर चढून क्लासिकल डान्स करत आहे. बॉलिवूड चित्रपटाच्या धूनवर ही तरुणी डान्स करत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ‘राम दूत हनुमान का नारा…’ या भजनावर देखील या तरुणीने नृत्य केले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
miss_pooja_official_887 या अकाउंट वरून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये युवती झाडाच्या टोकावर चढली आहे. आणि सर्वात विशेष बाब म्हणजे खूप बारीक फांदीवर चढून ती डान्स करत आहे. तिचा हा डान्स चांगला झाला असला तरी अत्यंत भीती निर्माण करणार आहे. जर ती फांदी तुटली तर काय होणार? असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहेत.
Jayant Patil । “घासूनपुसून काम करा, कुणाच्या घरी चहा…”, जयंत पाटलांचा पदाधिकाऱ्यांना दम