मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील पात्रांना प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. सध्या या मालिकेतील अनेक पात्र मालिका सोडून जात आहेत. या मालिकेमधील जेठालाल दया भाभी हे पात्र यांची जोडी प्रेक्षकांच्या आवडतीची जोडी आहे. पण जेठालाल बबिता यांच्यामधील एक वेगळीच केमिस्ट्री लोकांना विशेष आवडली आहे.
Amol Mitkari: “…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळणार” , राष्ट्रवादीचे अमोल मिटकरींचे भाकीत चर्चेत
‘या मालिकेमधील जेठालाल कायम बबिताजीच्या पाठीमागे असतो. तो तिच्याशी बोलण्यासाठी तो काही ना काही कारण काढत असतो. ‘बबिता’ हे पात्र मुनमुन दत्ता हिने साकारलेले आहे, मुनमुन दत्ता अभिनेत्री होण्याआधी काही वर्ष मॉडेलिंग करत होती. पण आता मुनमुनच्या दत्ताच्या खासगी आयुष्याबद्दल काही माहिती समोर आली आहे. तिच्या खऱ्या आयुष्यातही एक जेठालाल होता.
Sanjay Raut: ‘या’ तारखेला राऊतांच्या जामिन अर्जावर होणार सुनावणी
मुनमुनच्या दत्ताने (Munmun Dutta) एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तिचे अनेक लग्न झालेले मित्र तिला पसंत करतात. तिच्याशी फ्लर्ट करतात. ती पुढे म्हणाली , “असा प्रकार कोणत्याही महिलेला आवडत नाही आणि मलादेखील आवडत नाही. माझे अनेक लग्न झालेले मित्र माझी प्रशंसा करतात ते मला सांगतात की तू आमची क्रश आहेस त्यावर मीदेखील ठीक आहे एवढाच रिप्लाय देते”.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी मिळणार ‘इतके’ अनुदान