Salman Khan । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. बाईक वरून दोन जण आले आणि गोळीबार केला असल्याची माहिती मिळत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे.
माहितीनुसार, पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सलमान खान घरी होता. याआधी देखील सलमान खानला बऱ्याच वेळा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत आणि आज पहाटेच्या सुमारास घराबाहेर गोळीबार झाला यामुळे सलमान खानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Havaman Andaj । ब्रेकिंग! काही तासांत या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरवात होणार; हवामान विभागाचा इशारा
सूत्रांच्या माहितीनुसार, गोळीबाराच्या 2-3 राऊंड फायर झाल्या आहेत. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या घटनेमुळे सलमान खानच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
Sunetra Pawar । शरद पवारांच्या त्या विधानाने सुनेत्रा पवार दुखावल्या, माध्यमासमोरच लागल्या रडू