
Salman Khans Firing Case । बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी सोमवारी गुजरातमधील भुज येथून अटक केली. बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मसिही येथील विक्की साहेब गुप्ता (२४) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (२१) अशी आरोपींची नावे आहेत.
Loksabha Elections । भाजपला मोठं खिंडार, मोहिते पाटलांनंतर बड्या नेत्याचा राजीनामा
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईतील वांद्रे येथे सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुज जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली असून आज सकाळी त्यांना मुंबईत आणण्यात येणार आहे. माहितीनुसार, आरोपी वसई हायवे म्हणजेच मुंबई अहमदाबाद हायवेच्या दिशेने पळून गेले आहेत. त्यांनी ऑटो चालकाला वसई महामार्गाचा पत्ता विचारला होता.
Sharad Pawar । शरद पवारांचा भाजपाला पुन्हा मोठा धक्का, निष्ठावंत नेता करणार पक्षात प्रवेश
मंदिर परिसरातून अटक
पोलीस पथकाने आरोपीला मंदिर परिसरातून अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. मात्र, ते मंदिरात कसे आणि का गेले याचा उलगडा झालेला नाही, याबाबत कागदोपत्री कारवाई सुरू असून, आज सकाळी ९ नंतर आरोपींना मुंबईत आणले जाऊ शकतात. मुंबईत आणल्यानंतर प्रत्येक कोनातून तपास केला जाईल.
Congress । काँग्रेसचं वाढलं टेन्शन! बड्या नेत्यानं घेतली फडणवीसांची भेट