Sharad Pawar । सध्या लोकसभा निवडणुकांची सगळीकडे धामधूम पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या देखील माढा लोकसभा मतदार संघातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाकडून धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे भाजपसह महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. यामध्येच आता माण- खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे बंधु शिवसेनेचे शेखर गोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Manoj Jarange Patil । धक्कादायक बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यावर दगडफेक
जयकुमार गोरे यांचे बंधु शिवसेनेचे शेखर गोरे यांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माढा मतदार संघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मोहिते पाटील कुटुंबासह फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर देखील रणजित निंबाळकरांना विरोध करण्याची शक्यता असतानाच आता माण- खटाव तालुक्यात देखील भाजपचे टेन्शन वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधु शेखर गोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जवळपास १ तास शरद पवारांबरोबर चर्चा झाली आहे. या भेटीदरम्यान अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे देखील उपस्थित होते. यामुळे पुढील काळात माढा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Loksabha Elections । भाजपला मोठं खिंडार, मोहिते पाटलांनंतर बड्या नेत्याचा राजीनामा