Lok Sabha Election । कोल्हापूर : राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) चांगलेच वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष जोरात प्रचार करत आहेत. अटीतटीच्या लढतीत यंदा कोणाचे सरकार येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशातच आता सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Sangli Politics । सांगलीत ठाकरे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का
हा व्हिडीओ कोल्हापूरमधील (Kolhapur Constituency) असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये महिलांच्या गळ्यात महायुतीच्या पक्षाचे पट्टे होते.काही महिलांना 200 रूपये देतो असं सांगत प्रचार रॅलीला बोलावण्यात आलं होत. पण रॅली पूर्ण होऊनही पैसे न दिल्याचा दावा महिला व्हिडीओमध्ये करत आहे. हा व्हिडिओ केव्हाचा आहे हे अजूनही समजले नाही, पण सध्या तो खूप व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे या महिलांनी आपल्यासोबत लहान मुलांना घेत फॉर्म भरण्याच्या ठिकाणी उपस्थिती दाखवली. काही महिलांना 200 रूपयांचं आमिष दाखवून एकही रूपया दिला नाही. सध्या या व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमनेसामने येतील, यात काही शंकाच नाही.
Odisha Bus Accident News । प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसचा भीषण अपघात; पाहा व्हिडीओ