Sharad Pawar । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर; शरद पवारांनी खेळली मोठी खेळी

Sharad Pawar

Sharad Pawar । सध्या राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षफुटी झाल्यांनतर शरद पवार गटाची अनेक बड्या नेत्यांनी साथ सोडली मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते शरद पवार गटात प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तर यामधील काही नेत्यांना उमेदवारी देखील देण्यात आली आहे. दरम्यान सध्या देखील आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांचीही शरद पवार गटाला साथ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar । मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवारांची जीभ घसरली; केले वादग्रस्त वक्तव्य

अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर (Bhushan Singh Holkar) हे शरद पवार गटात लवकरच प्रवेश करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आज त्यांचा प्रवेश होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर हे शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत.

Accident News । भीषण अपघात, कार-ट्रेलरच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू

हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडल्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार महाराष्ट्र ‘प्रदेश उपाध्यक्ष’ पदी निवड करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे हे आज लोकसभेसाठी अर्ज भरणार आहे, यावेळी तिथेच . भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर यांचा प्रवेश होणार आहे.

Ajit Pawar । “आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा, नाहीतर…” अजित पवारांचे खळबळजनक वक्तव्य

Spread the love