अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे देवेंद्र फडणवीसांनी आज सांगितले आहे. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज निळवंडे, कुकडी सिंचन प्रकल्प आणि गोदावरी कालवा प्रकल्पांच्या कामाबाबत मंत्रालयात बैठक झाली. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस (Devednra Fadanvis) यांनी या सूचना दिल्या आहेत.
Eknath Shinde: “जो काही निर्णय होईल तो…” , निवडणूक आयोगाच्या सुनावणीबद्दल मुख्यमंत्री शिंदेंच भाष्य
या बैठकीसाठी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, त्याचबरोबर जलसंपदा विभागाचे सचिव राजन शहा, आणि विलास राजपूत इत्यादी उपस्थित होते. निळवंडे सिंचन या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. त्याचबरोबर केंद्रसरकारकडे देखील लवकरात लवकर पाठपुरावा करावा. अशा सुचना फडणवीसांनी दिल्या आहेत.
निळवंडे प्रकल्पाचा प्रस्तावित तांत्रिक समितीकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच मान्यता दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. निळवंडे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील वितरण प्रणालीचे काम बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे प्रस्तावित आहे. याला राहुरी मधील काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे असे बैठकीत सांगण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत शेतकरी वर्गाची देखील बैठक घेतली जाईल असे फडणवीस म्हणाले.
Mahesh Babu: मोठी बातमी! सुपरस्टार महेश बाबूच्या आईचे निधन; पहाटे ४ वाजता घेतला अखेरचा श्वास