
Congress । लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते ए आर अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार लवकरच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. 23 एप्रिल रोजी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवार यांचा लोकसभेचा अर्ज नामंजूर
मुश्ताक अंतुले हे सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रण मंडळातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मुश्ताक अंतुले आणि सुनील तटकरे यांचे जवळचे नाते आहे. त्यामुळे 23 एप्रिल रोजी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुश्ताक अंतुले पक्षप्रवेश करणार आहेत.
अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकमेकांना भेटत असतात. दरम्यान, निवडणुकीच्या रणधुमुश्ताक अंतुले राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मुश्ताक हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.