
Manoj Jarange Patil । राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. राज्यात निवडणुकीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मराठ्यांचं वर्चस्व विधानसभेला दाखवून देऊ असा गंभीर इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. (Maratha Reservation)
“मी कोणात्याच अपक्षाला पाठिंबा दिला नाहीये. ना कुणाला उभा केले आहे, कोणता गामीनी कावा करीत नाहीये, शिवाय महायुती किंवा आघाडीला सुद्धा माझा पाठिंबा नाही. मराठा आरक्षणाची (Maratha Reservation Strike) आमची मागणी मुकाट्यानं मागणी करा. आम्हाला राजकारणाच्या वाटेवर आणू नका. नाहीतर मराठ्यांच वर्चस्व काय असतं, हे तुम्हाला विधानसभेला दाखवून देऊ. तसंच आपण स्वतः मैदानात असू,” असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी पुन्हा महाविकास आघाडीला मोठा धक्का! ‘या’ आमदाराने दिला राजीनामा
पुढे ते म्हणाले की, “सगे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मी 4 जूनला आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहे. 8 जूनच्या नावागड येथील सभेला मी जाणार आहे. तेथे करोडोने मराठा येणार आहेत. त्या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. परत येताना रुग्णवाहिकेतूनच आंतरवाली जाऊन आमरण उपोषण करणार आहे,” असेही जरांगे पाटलांनी स्पष्ट केले आहे.
Rohit Pawar । “अजित पवारांना भाजपनं लोकल नेता बनवलं,” रोहित पवारांची जहरी टीका