Rajvir Singh Diler Death । ब्रेकिंग! निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का देणारी वाईट बातमी समोर; खासदाराचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Rajvir Singh Diler Death

Rajvir Singh Diler Death । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच भपसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमधील भाजप खासदार राजवीर सिंग दिलर यांचे बुधवारी (२४ एप्रिल) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. खासदार दिलर हे त्यांच्या अलिगड येथील निवासस्थानी असताना अचानक बेशुद्ध पडले. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Ajit Pawar । शरद पवारांबाबत अजित पवार यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

खासदार राजवीर सिंग दिलर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, कौटुंबिक सूत्रांनी सांगितले की, राजवीर सिंग दिलर यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी सुरक्षा विहार येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Manoj Jarange Patil । बिग ब्रेकिंग! जरांगे पाटलांची बिघडली तब्येत, तातडीने रुग्णालयात केले दाखल

राजवीर सिंग दिलर 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर हातरस मतदारसंघातून निवडून आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. या जागेवरून अनूप वाल्मिकी यांना उमेदवारी दिली आहे.

Crime news । बारामती हादरली! लाईटचे बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला, महिलेचा जागीच मृत्यू

Spread the love