Crime News । गोंदिया जिल्ह्यात एका 12 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ एप्रिल रोजी घडली. या घटनेतील अज्ञात आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेच्या निषेधार्थ काही आदिवासी संघटनांनी देवरी उपजिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवार व बुधवारी निदर्शने करून दोषीला लवकर अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी सहावीत शिकत होती. 19 एप्रिल रोजी ती तिच्या आई-वडिलांसोबत देवरी तालुक्यातील गोतनपार गावात एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेली होती. तेथून अज्ञात व्यक्तींनी तिचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
Ajit Pawar । शरद पवारांबाबत अजित पवार यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मुलगी सापडली नाही तेव्हा तिच्या पालकांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान, 20 एप्रिल रोजी गोतनपार गावाजवळील ढवळखेडी जंगलात पीडितेचा विकृत मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच चिचगड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हा दाखल केला.
Manoj Jarange Patil । बिग ब्रेकिंग! जरांगे पाटलांची बिघडली तब्येत, तातडीने रुग्णालयात केले दाखल
घटनेला पाच दिवस उलटूनही अटक न झाल्याने बुधवारी काही स्थानिक आदिवासी संघटनांच्या सदस्यांनी उपजिल्हा दंडाधिकारी कार्यालयात निदर्शने करून निवेदन दिले.