मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमामध्ये देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरुन वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत असं वक्तव्य केलं होत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चाना उधाण आले आहे. अशातच छगन भुजबळांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली आहे.
शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार? ‘असा’ करा बचाव, वाचा सविस्तर
एकनाथ शिंदे म्हणाले, “कुठलेच फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल. त्यांना वाटेल ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटतं तेच आम्ही करणार आहोत”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी भुजबळांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
कौतुकास्पद! गुणवरे ता.फलटणच्या सानिया दयानंद गावडेची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
देवी सरस्वतीला कोणी पाहिलं आहे का? असा प्रश्न भुजबळांनी भर कार्यक्रमामध्ये केला आहे. त्याचबरोबर पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असंहि छगन भुजबळ म्हणाले. शाळेत सरस्वतीचा फोटो कशालापाहिजे? शाळांमध्ये महात्मा फुले, डॉ.बबसाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग दौंड यांच्यामार्फत खडकी येथे शेतकऱ्यांना बियाणांचे मोफत वाटप