Srinivas Pawar । 2019 मधील शपथविधी राज्याच्या राजकारणात अजूनही चर्चेत आहे. या शपथविधीबाबत अनेक बडे नेते गौप्यस्फोट करत आहेत. सध्या देखील आता या शपथविधीबाबत अजित पवार यांचे सख्ख्ये बंधू श्रीनिवास पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्या शपथविधीपूर्वी अजित पवार यांना भाजपशी चर्चा करण्याचे शरद पवार यांनी सांगितल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना श्रीनिवास पवार यांनी सांगितले आहे.
Ahmednagar Accident । अहमदनगमध्ये बस आणि इर्टिगा गाडीचा भीषण अपघात; ४ ज्यांचा जागीच मृत्यू
नेमकं काय म्हणाले श्रीनिवास पवार?
श्रीनिवास पवार म्हणाले, “२०१९ मध्ये भाजपशी चर्चा करण्यास अजित पवार यांना सांगितले होते. परंतु त्यांना निर्णय घेण्यास सांगितले नव्हते. चर्चा करुन शपथविधी घ्या, असे सांगितले नव्हते. असा गौप्यस्फोट श्रीनिवास पवार यांनी केला आहे. यामुळे राजकोय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांना याबाबत चर्चा करण्याचा अधिकार होता कारण प्रत्येक पक्षात अशी चर्चा करण्याचे अधिकार ठरविक नेत्याकडे दिले जातो. ही चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष घेतात घेतात. यामुळे त्या वेळचा निर्णय पवार साहेबांचा नव्हता. तो निर्णय जर शरद पवार साहेबांचा असता तर त्यांनी ते सरकार पडू दिले नसते. असे श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.
KPK Jeyakumar । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! काँग्रेस नेत्याचा मृतदेह आढळला जळालेल्या अवस्थेत