Rohit Pawar । सध्या बारामतीत (Baramati) अनेक मोठ्या घडामोडी घडत असल्याचे दिसत आहे. बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस…यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत…यासाठीच पाहीजे होती का ‘Y’ दर्जाची सुरक्षा? असं गंभीर आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
रोहित पवार यांना तातडीने अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी याबाबत एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. “रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघात रडीचा डाव सुरु केला.नेहमी कट,कारस्थान करणाऱ्या रोहित पवार यांना तात्काळ अटक करून अजून किती गुंड राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी सोडले आहेत याची चौकशी निवडणूक आयोग व ग्रह खात्याने करावी” असे ट्विट त्यांनी केले आहे.
Mumbai Crime । मुंबई हादरली! लोकल ट्रेनमध्ये बेल्टने मारहाण करून वृद्धाची हत्या
सुरज चव्हाण यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) आज मतदान पार पडत आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी काटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघात रडीचा डाव सुरु केला.नेहमी कट,कारस्थान करणाऱ्या रोहित पवार याना तात्काळ अटक करून अजून किती गुंड राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी सोडले आहेत याची चौकशी निवडणूक आयोग व ग्रह खात्याने करावी. pic.twitter.com/2hszYRcItx
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) May 7, 2024