मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यामुळे शिवसेनेमध्ये (Shivsena)मोठी दरी निर्माण झाली आहे. तेव्हापासून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पाहायला मिळतायेत. हे दोन्ही गट कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यामध्येच आता ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर रामदास कदम यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे, असं म्हणत जोरदार टीका केली आहे. आता या टीकेला रामदास कदमांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.
शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार? ‘असा’ करा बचाव, वाचा सविस्तर
माध्यमांशी संवाद साधताना रामदास कदम म्हणाले, “जाधवांना येडा झालेला कुत्रा चावला आहे. त्यांचा मेंदू सडलेला आहे . नासक्या डोक्यातून नासके विचार येतात, असं म्हणत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भास्कर जाधवांना जोरदार उत्तर दिलं आहे.
Ramdas Kadam: शिवसेना का फुटली?, रामदास कदमांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले…
त्याचबरोबर पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, “बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून भास्कर जाधवांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. परत, शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेमध्ये आले. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खूश करण्यासाठी हे बाटगे पणा दाखवतायेत. अशा शब्दांमध्ये रामदास कदम यांनी भास्कर जाधवांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Rain: मोठी बातमी! येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता