Madhya pradesh News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील बैतुल लोकसभा मतदारसंघातील आहे मंगळवार, 7 मे रोजी ही बस सहा मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना घेऊन बैतूलच्या जिल्हा मुख्यालयाकडे येत असताना वाटेत ही घटना घडली.
EVM Fire News । माढा लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वात मोठी बातमी, व्यक्तीने EVM मशीनच पेटवली
या अपघातात सर्व मतदान कर्मचारी सुरक्षित आहेत. आगीच्या वेळी बसमध्ये EVM आणि VVPATही ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैतुलच्या मुलताई विधानसभेच्या २७५ रजापूर, २७६ डंडर, २७७ गहूबरसा १, २७८ गहूबरसा २, २७९ कुंडाराईत आणि २८० चिखली माळ मतदान केंद्रावरील मतदान कर्मचारी बसमधून प्रवास करत होते.
Ajit Pawar । मिश्या काढण्यासंदर्भात अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; श्रीनिवास पवारांना लगावला टोला
पीठासीन अधिकारी मुन्नालाल यांनी सांगितले की, मतदान संघाच्या काही मशीन जळाल्या आहेत. त्यांच्यासोबत ठेवलेले सामान आणि काही पिशव्याही जळाल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्ही पॅटसह सहा मतदान संघ होते. मुन्ना लालने सांगितले की, त्यांचे व्हीव्ही पॅट, बॅलेट पेपर, सील इत्यादीही जळाले आहेत.