यंदाच्या वर्षी पाऊस (Rain) चांगला पडला आहे. त्यामुळे पिकांची वाढ देखील चांगल्या प्रकारे होईल. दरम्यान या दिवसात आपल्याकडे तुर (Tur) या पिकामधील सोयाबीन कापणी झाली आहे. त्यामुळे तुर या पिकांमध्ये खोल मशागत (Cultivation) करू नये, तसेच शक्यतोवर रोटावेटर करूच नये. याच कारण म्हणजे जमिनीचा वरचा भाग भुसभुशीत दिसत असला तरी जमीन (land) ओलसर असल्यामुळे खालील भाग टणक असल्याने तुरीच्या मुळ्या अडचणीत येतात. त्यामुळे जर तुरीत तन किंवा काडीकचरा नसेल तर आंतर मशागत नाही केली तरी चालेल.
Ramdas Kadam: शिवसेना का फुटली?, रामदास कदमांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले…
महत्वाचं म्हणजे जरी आंतर मशागत करावयाची झाल्यास अगदी हलकी आंतरमशागत करावी. जेणेकरून सक्रिय मुळ्या/ जारवट तुटणार नाही ही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. बहुतेक वेळा तूर या पिकाला जास्त पाणी दिले जाते. त्यामुळे देखील तुर उत्पादनात घट होते किंवा अपरिपक्व दाणे ( मुकंन) जास्त प्रमाणात तयार होऊन प्रत खालावते. म्हणून तूर या पिकाला पाणी देताना कळी येण्याची व्यवस्था व दुसरे पाणी फुलं गळून शेंगा पकडल्यानंतर पाणी देणे.
Rain: मोठी बातमी! येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता
तुरीचे कमी उत्पादन येण्याचे कारण म्हणजे वेळेवर न केलेले पीकसंरक्षण. बऱ्याचदा शेतकरी तुर पिकला फुले येण्याची वाट बघतात नंतर फवारणी करतात. हे न करता शेतकऱ्यांनी तुर पिकला कळी दिसावयास लागली की पिकावर फवारणी करावी कारण कळी वरती फुले उमलण्याच्या आधी फुलपाखरं अंडी घालतात व अळी बाहेर पडून फुले उमलल्या पूर्वी कळी खाऊन टाकतात.
तुर पिकला अशी करावी फवारणी
कळी अवस्थेत पहिली कीटकनाशकाची फवारणी करताना त्यामध्ये (डायथेन एम-45 + कार्बनडॅझिम ) 30 ग्रॅम + इमामेक्टीन बेंजोएट 10 ग्रम + क्लोरोपायरीफॉस 35 मिली +सूक्ष्म मूलद्रव्य 25 ग्राम प्रति पंपास (15 लिटर) घेऊन फवारणी करणे. दरम्यान पुढे 12 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. यामधे बाराझाइड, इविसेन्ट, आॅम्लीगो, फेनास क्कि या पैकी एक फवारणी करावी किंवा क्लोरोअल्ट्रानीलीप्रोल 7 मिली प्रति पंपास (15 लिटर) घेऊन फवारणी करणे. महत्वाची बाब म्हणजे हे यानंतर शक्यतोवर फवारणीचे काम पडणार नाही. तरी पण गरज भासल्यास तिसरी फवारणी करणे.
शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार? ‘असा’ करा बचाव, वाचा सविस्तर