मुंबई : रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण यांचं नाव नेहमीच बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांमध्ये आघाडीवर असतं. दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग याचं नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न झालं. त्याआधी सहा वर्षे ते रिलेशनमध्ये होते. लग्नानंतरही ही जोडी कायम चर्चेत राहिली आहे. दोघांनीही काही चित्रपटांमध्ये (Movies) एकत्र काम केलं आहे. पण मागच्या काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीर यांच्या वैवाहिक आयुष्यात (married life) वादळ आल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Ramdas Kadam: “नासक्या डोक्यातून नासके विचार येतात…”, रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल
या दोघांच्या नात्यात दुरावा आला असून दोघंही वेगळे होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अशातच रणवीरने या सर्व चर्चांवर मौन सोडत एका मुलाखतीत पती-पत्नीतील संबंध कसे आहेत यावर मनमोकळेपणे भाष्य केलं. रणवीरचा हा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Ramdas Kadam: शिवसेना का फुटली?, रामदास कदमांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले…
काय म्हणाला रणवीर
या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणाला, “देवाची कृपा आहे… आम्ही दोघं एकमेकांना भेटलो. २०१२ मध्ये आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. आज दहा वर्षांनंतर २०२२ पर्यंत आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. ”रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या चर्चा केवळ अफवा असल्याचं समोर आलं आहे.
Rain: मोठी बातमी! येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता
Meanwhile: Ranveer about Deepika in today’s event #DeepikaPadukone #RanveerSingh #Deepveer https://t.co/Jn6vfb3ZKs pic.twitter.com/MTS7GfzpjZ
— . (@rs____321) September 27, 2022
इतकंच नाही तर अलिकडेच रणवीर आणि दीपिकाचा एका अवॉर्ड शोमध्ये वेगळाच अंदाज पाहायला मिळाला होता. फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार रणवीरला मिळाला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना रणवीरने या यशाचं सगळं श्रेय पत्नी दीपिकाला दिलं होतं. दीपिकाच त्याची सर्वात मोठी ताकद असल्याचंही म्हटलं होतं.
सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण; वाचा सविस्तर