मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांना घेऊन बंड पुकारले होते. यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आणि अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळलं. दरम्यान यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. अस म्हणल जात की,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यात पुन्हा आघाडी सत्ता आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा आहे. दरम्यान याबाबत इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी एक मोठं विधान केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! विवाहित-अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की,“निवडणुकीत काय होतं हे आमच्यापेक्षा जवळून कोणी पाहिलेलं नाही. शरद पवारांचं ५५ वर्षांचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्यात जितके चढ आहेत तितकेच उतार आहेत. कारण ते ५५ वर्षांतील २७ वर्ष ते सत्तेत आणि २७ वर्ष विरोधात होते. पण महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं आहे अस मी नेहमी त्यांना सांगते. पण हे मात्र खर आहे की विरोधात असताना महाराष्ट्राने सर्वात जास्त प्रेम दिलं,” अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या.“जेव्हा शरद पवार विरोधात जाऊन दौऱ्यावर निघतात तेव्हा पण काय गंमत होते माहिती नाही. पण काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात,” असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केली.
एलपीजी ग्राहकांनो सावधान! आता वर्षभरात केवळ 15 तर महिन्याला फक्त 2 सिलेंडर मिळणार
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की,“महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. सगळे म्हणत होते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला आम्ही रोज सकाळी उठलो की आज पक्ष सोडून कोण गेलं पहायचे.आणि जर कोणी पक्ष सोडून गेलं नाही तर आम्ही संध्याकाळी सुटकेचा निश्वास सोडायचो. दुसऱ्या दिवशी इतके लोक पक्ष सोडून जात होते की काही हिशोबच नव्हता. त्यावेळी दोन्ही खिशात काही नाही असं होतं. पण जेव्हा शरद पवार सोलापूरला गेले आण जी कुस्ती सुरु झाली, ती निकालाच्या दिवशीच संपली,” असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.
Deepika-Ranveer: दीपिका-रणवीरच वैवाहिक आयुष्य बिनसलं? चर्चांवर अभिनेत्यानं सोडलं मौन