Big Boss: येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार ‘बिग बॉस’चा चौथा पर्वा, पहिल्या स्पर्धक जोडीचा बोल्ड डान्सचा व्हिडीओ समोर

The fourth episode of 'Bigg Boss' will start from October 2, the bold dance video of the first contestant pair is in front.

मुंबई : ‘बिग बॉस’या (Big Boss) कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त आणि कायमच चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. एवढच नाही तर कायमच हा शो सुपरहिट ( superhit show) असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे बिग बॉसच्या स्पर्धकांमधील नवनवीन टास्क, राडे, मैत्री आणि होणारे वाद या कारणांमुळे हा शो कायमच चर्चेत असतो. दरम्यान येत्या 2 ऑक्टोबरपासून बिग बॉसचे चौथे पर्व (fourth season) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बाकीच्या तिन्ही पर्वा प्रमाणे या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) करणार आहेत. तसेच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना क्वॉरंटाईनची अट काढून टाकण्यात आली आहे

केंद्र सरकारने डीएपी आणि युरियाचे जाहीर केले नवे भाव; ‘इतक्या’ रुपयांना मिळणार युरियाची पिशवी

विशेष म्हणजे सध्या या पर्वात कोणकोणते स्पर्धक दिसणार आहेत याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. दरम्यान अशातच कलर्स मराठीने बिग बॉसचा प्रिमिअर सोहळ्याचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रॉमोमध्ये बिग बॉसच्या पहिल्या स्पर्धक जोडीची झलक दाखवली आहे. मोहे रंग लगा दे रे या गाण्यावर ते दोघेही बोल्ड डान्स करताना दिसत आहे. पण यात त्या दोघांचा चेहराही लपवण्यात आला असून त्यांचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. परंतु हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी ही तरुणी अभिनेत्री नेहा खान असल्याचं म्हटलं आहे.

IAS: “… मग उद्या कंडोम देखील मोफत द्यावे लागतील”, आयएस अधिकाऱ्याचे वक्तव्य चर्चेत

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमो व्हिडीओला“मंचावर रंगणार दिलखेचक अदाकारी, कोण असतील हे स्पर्धक? बिग बॉस मराठी ग्रँड प्रिमिअर 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर”, असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान काही चाहत्यांनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. “असे घाणेरडे डान्स कृपया दाखवू नये..आम्ही सर्व जण सोबत टीव्ही बघतो. खूप खराब..माझा 8 वर्षाचा मुलगा सुद्धा बघतो ..तो हसत होता …मी काहीच बोलू शकलोनाही.. स्वामी समर्थ सिरीयलच्या मध्ये ही घाणेरडी अॅड आली..कृपया भान ठेवावं”, असा संताप एका नेटकऱ्याने व्यक्त केला आहे.

Supriya sule: शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *