Bhushi Dam Incident । पुण्यातील लोणावळा परिसरात रविवारी एक मोठी घटना घडली. लोणवळ्यातील डोंगरात वसलेल्या भुशी डॅमजवळ सहलीसाठी गेलो असताना अचानक धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला. 10 जण वाहून गेले, त्यापैकी पाच जण वाचले. तर उर्वरित पाच जणांचे मृतदेह रविवारी आणि सोमवारी बाहेर काढण्यात आले. यांनतर सरकार देखील ऍक्शन मोडवर आले आहे.
Ajit Pawar । राजकारणात मोठ्या घडामोडी! अजित पवारांनी नवाब मलिक यांना बोलावले बैठकीला
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आज अजित पवार यांनी राज्यातील आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना दिले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा देखील विधानसभेत केली.