Vasant More । वसंत मोरे यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना-यूबीटी पक्षात प्रवेश केला. 2024 ची लोकसभा निवडणूक त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. त्यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली असली तरी येथे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. वसंत मोरे हे आधी राज ठाकरेंच्या मनसेत होते. मार्चमध्येच मनसे सोडली होती.
Restart and Reboot । स्मार्टफोन रीस्टार्ट आणि रीबूट यामध्ये काय फरक आहे? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरे यांचे स्वागत केले. एक दिवसापूर्वीच संजय राऊत यांनी वसंत मोरे शिवसेना-यूबीटीमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. शिवसेना-यूबीटीमध्ये सामील झाल्याचा फोटो शेअर करताना वसंत मोरे यांनी ‘X’ वर लिहिले, “जय महाराष्ट्र”.
पुण्यातून वसंत मोरे यांचा भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला आहे. मोरे यांना केवळ 32,012 मते मिळाली आणि त्यांचे डिपॉझिट गमवावे लागले. तर मुरलीधर मोहोळ यांना विजयी केल्यानंतर भाजपने त्यांना केंद्रीय मंत्री केले आहे. वसंत मोरे यांनी १२ मार्च रोजी मनसे सोडली होती. 18 वर्षे ते या पक्षात राहिले. तेव्हा वसंत मोरे यांनी राजीनाम्यामागे पक्षातील अंतर्गत राजकारण असल्याचे सांगितले. जेव्हा वसंत मोरे यांनी राजीनामा दिला होता तेव्हा त्यांचा एक फोटोही व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते राज ठाकरेंच्या फोटोपुढे साष्टांग नमस्कार घालताना दिसले होते आणि म्हणाले होते की, साहेब मला माफ करा.
Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला इशारा