BMW Hit And Run । मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. बीएमडब्ल्यू अपघातापूर्वी आरोपी मिहीर शाहने मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केले होते. घटना घडण्यापूर्वी त्याने व्हिस्कीचे 4 मोठे पॅक आणि 2 लीटर बिअर प्यायल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी सांगितले की, जुहूमध्ये मिहीरने त्याच्या तीन मित्रांसह प्रथम व्हिस्की प्यायली, त्यावेळी ड्रायव्हर राजऋषी बिदावत बाहेर उभा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तेथून ड्रायव्हर राजऋषी याने मिहीरच्या मित्रांना बोरिवली येथे सोडले आणि तेथून तो ड्रायव्हर बिदावतसह त्याच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये मरीन ड्राइव्हला जाण्यासाठी निघाला. असे सांगितले जात आहे की मरीन ड्राइव्हला निघताना मिहीरने वाटेत मालाड येथील साईप्रसाद बारमधून 4 बिअरच्या बाटल्या (500 एमएल प्रति बाटली) विकत घेतल्या आणि त्यानंतर त्याने ड्रायव्हर राजऋषीला बिअर पिण्याची ऑफर दिली पण त्याने नकार दिला. त्यानंतर मिहीर शहाने बिअरच्या चारही बाटल्या संपवल्या.
Viral Video । वेगवान कारमध्ये रील बनवताना 5 मित्रांचा अपघात; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह हा जीवघेणा अपघात झाला तेव्हा दारूच्या नशेत होता, असे मुंबई पोलिस अधिकाऱ्याने गुरुवारी (11 जुलै) सांगितले. शिवसेना नेते राजेश शहा यांच्या मुलाच्या मालकीच्या या BMW कारने मुंबईतील वरळी येथे स्कूटीला धडक दिल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा पती जखमी झाला.