शेतकऱ्यांनी (Farmers) सध्या उसाच्या पिकावर जोर दिला आहे. या पिकातून शेतकऱ्यांना थोडेफार पैसे मिळतात. परंतु जास्त पैसे मिळवण्यासाठी उसाचा (sugar cane) कोणता वाण (variety)लावावा हे महत्वाचं असतं. कारण उसाच्या प्रत्येक वाणानुसार टनामागे मिळणारं साखरेचं प्रमाण म्हणजेच साखरेचा उतारा बदलतो. आणि महत्वाचं म्हणजे त्यावरूनच उसाचे दर ठरतात. दरम्यान या उसाच्या वाणावरून आणि त्याच्या मिळणाऱ्या दरामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि साखर उद्योगात अनुभवी असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये (Osmanabad) बोलताना शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
नेमका अजित पवारांनी काय दिला सल्ला
उस्मानाबादमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, “माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे 265 उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका. कारण सध्या रानं ओली आहेत त्यामुळे वापसा नाही. म्हणून आत्ता लगेच उसाची तोडणी झाली तर रिकव्हरी चांगली होणार नाही. महत्वाची बाब म्हणजे जर उसाची रिकव्हरी चांगली आली तरच उतारा चांगला पडतो आणि त्यानुसारच साखर जास्त निघते. सरळ सरळ आहे जर साखर जास्त निघाली, तरच भाव चांगला मिळतो.”
मुलींना मांडीवर बसवून शिक्षक करायचा ‘हे’ काम, पालकांनी चप्पलचा हार घालत संपूर्ण गावात काढली धिंड
पुढे अजित पवार म्हणाले की, “एका टन ऊसातून किती साखर निघते यावर ते अवलंबून असतं.कारण काही ठिकाणी १० टक्के, ११ टक्के, १२ टक्के निघते. कोल्हापुरात तर टनामागे ११४ किलो साखर निघते. म्हणजे १४ टक्के साखर निघते. एवढा विरोधाभास आहे.तुमचा ऊस वेळेवर जायचा असेल, भाव चांगला मिळवायचा असेल तर ८६-०-३२ , ८०-०५, १०-००१, १२-१२-१ ही उसाची बेणी वापरा.” असा सल्लादेखील अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला.
Nagaraj Manjule: या दिवशी येणार नाळ चित्रपटाचा दुसरा भाग,नागराज मंजुळेंनी शेअर केली पोस्ट
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की , “आम्ही वसंतदादा शुगर इन्स्ट्युट ही संस्था शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवतो. महत्वाची बाब म्हणजे तिथं नवीन उसाचं बेणं तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यामध्ये कमी पाण्यात त्या उसाला दशी न पडता उसाचं टनेज जास्त येईल यावर संशोधन करत आहेत. मग त्यातून काही वाणांचा शोध लगाला. पाडेगावमध्ये काही वाण आम्ही प्रसिद्धीला आणल्या. इतकंच नाही तर कोल्हापूरमध्ये आजरा तालुक्यातील भागात नवीन बेणं शोधलं,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.
Rashmika-Vijay: विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर रश्मीकाने सोडलं मौन; म्हणाली…