Ajit Pawar । विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची बहीण आणि राष्ट्रवादीच्या खासदार (शरद गट) सुप्रिया सुळे यांच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाव बदलून दिल्लीला गेल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले की, मी नाव बदलून दिल्लीला गेलो हे सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईन आणि नाही तर आरोप करणाऱ्यांनीही राजकारणातून संन्यास घ्यावा. (Politics News )
Swapnil Kusale Wins Bronze । पट्ठ्यानं जग जिंकल! स्वप्नील कुसळेला नेमबाजीत कांस्यपदक
अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव बदलून दिल्लीत येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यांनी बोर्डिंग पासमध्ये नावही बदलले होते. त्यांनी संसदेतही हा मुद्दा उपस्थित करून यांच्या चौकशीची मागणी केली होती. यांची चौकशी दिल्ली आणि मुंबईच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी करावी, असे सुळे म्हणाल्या.
बहीण सुप्रिया यांच्या आरोपांवर अजित पवार म्हणाले की, मी छुप्या पद्धतीने राजकारण करत नाही. नाव बदलून दिल्लीला गेल्याचे सत्य सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन. असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. सध्या या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.