Sharad Pawar । सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेते समरजित घाटगे यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे.
Assembly Elections । विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, अजित पवार टाकणार नवीन डाव
समरजित घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. मात्र त्यांना शरद पवार गटाकडून दोन वेळा ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात घाटगे यांना शरद पवार गटाकडून ऑफर देण्यात आली आहे. मात्र अद्याप ही ऑफर घाटगे यांनी स्वीकारलेली नाही. त्यामुळे येत्या काळात घाटगे तुतारी हाती घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. सध्या देखील घाटगे यांना शरद पवार गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. जर घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर फडणवीस यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Assembly Elections । विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, अजित पवार टाकणार नवीन डाव