Ladki Bahin Yojna । मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेबाबत समोर आली मोठी अपडेट!

Mazi Ladki bahin Yojna

Ladki Bahin Yojna । मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्तापर्यंत करोडो महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून अर्ज प्रक्रिया सुरू असून पहिला हप्ता कधी येणार? दरम्यान, पहिल्या हप्त्याची नेमकी तारीख आता समोर आली आहे.

Team India Hockey । भारतीय हॉकी संघाने स्पेनचा पराभव करत जिंकले कांस्यपदक!

वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकार या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १७ ऑगस्ट रोजी पाठवणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात पात्र महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे पाठवले जाणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Shinde Sarkar Decision । विनापरवाना झाड तोडले तर भरावा लागेल इतक्या हजारांचा दंड, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारतर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांद्वारे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांसाठी पात्र महिलांच्या बँक खात्यावर एकत्रितपणे 3000 रुपये पाठवले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मराठीतून भरलेले अर्ज फेटाळले जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मराठीत अर्ज सादर करणाऱ्या कोणत्याही महिलेचा अर्ज फेटाळला जाणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले होते.

Mumbra News । चिमुकली रस्त्याने चालत असताना अचानक एक पाळीव कुत्रा तिच्या अंगावर पडला; ३ वर्षाच्या मुलीचा जागीच अंत

Spread the love