Politics News । महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, बड्या नेत्याचे शरद पवारानांवर धक्कादायक आरोप!

Sharad Pawar

Politics News । राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरून मला अटक करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. अनिल देशमुख जे आरोप करत आहेत ते बिनबुडाचे आणि खोटे असल्याचे ते म्हणाले. अनिल देशमुख स्वतःला वाचवण्यासाठी हे सर्व आरोप करत आहेत. भाजपला नेस्तनाबूत व्हावे यासाठी खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar । अजित पवारांनी भरसभेत मागितली माफी; म्हणाले, “चूक झाली…”

त्यांना खोट्या प्रकरणात अडकवून अटक कशी करायची यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या घरी सिल्व्हर ओक येथे बैठक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ खडसेंच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मला गोवण्याचा प्रयत्न केल्याचे गिरीश महाजन म्हणाले. शरद पवारांचा माझ्यावर दबाव असल्याचे खुद्द अनिल देशमुख यांनी मला सांगितले. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट. माझ्या गाडीत ड्रग्ज टाकून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. असे आरोप महाजन यांनी केले आहेत. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Redmi Note 14 Pro स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च; ‘हे’ असतील फीचर्स

पुढे ते म्हणाले की, परमवीर सिंग आज जे आरोप करत आहेत. ते अगदी बरोबर आहे. मला आणि देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये गोवण्याचा कट होता. अनिल देशमुख म्हणाले की, माझ्यावर शरद पवारांचा दबाव आहे. एकनाथ खडसे जाऊन पवारांसमोर बसतात आणि मला खडसावले जाते. माझे म्हणणे खोटे वाटत असेल तर अनिल देशमुखांना माझ्यासमोर उभे करा, असे गिरीश महाजन म्हणाले.

Brain hemorrhage । डोक्याला दुखापत झाल्यास ब्रेन हॅमरेज होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ञांचे मत

Spread the love