Palghar Crime News । धक्कादायक घटना! महिलेने आपल्या निष्पाप मुलाची गळा आवळून केली हत्या

Crime

Palghar Crime News । पालघर जिल्ह्यात मुलाची हत्या आणि नंतर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यात एका महिलेने आपल्या अडीच वर्षाच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी शनिवारी (10 ऑगस्ट) या संदर्भात माहिती दिली. ही घटना आदिवासीबहुल जव्हार तालुक्यातील गादरवाडी गावात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, या महिलेचे नाव 23 वर्षीयअसून लक्ष्मी भामरे असे नाव आहे.

Vijay Kadam Passed Away । चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेते विजय कदम यांचं निधन

जव्हार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “लक्ष्मी भामरेने तिच्या अल्पवयीन मुलाचा गळा दाबून खून केला आणि नंतर आत्महत्या केली. महिलेचा पती व सासरे शेतात गेले असताना दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे तेथील परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांनी सांगितले की, महिलेने हे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Brazil Plane Crash । विमानाचा मोठा अपघात, 62 प्रवाशांना घेऊन उड्डाण करणारे विमान अचानक जमिनीवर पडले, भयानक व्हिडिओ समोर

Spread the love