Accident News । भयानक अपघात! डंपरने महिलेला चिरडले, दोन्ही पायावरून गेले चाक

Accident News

Accident News । सध्या अपघाताची एक भयानक घटना समोर आली आहे. अकोल्यामध्ये भरधाव डंपरने महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात एवढा भयानक होता की, या अपघातामध्ये महिलेच्या दोन्ही पायांवरून डंपर गेला आहे. माहितीनुसार अकोला शहरातील मूर्तीजापुर मार्गावर ही घटना घडली आहे. (Akola Accidetn News)

Mumbai Crime । मुंबई हादरली! फक्त 30 रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, नेमकं काय घडलं?

माहितीनुसार, अकोला शहरातील मूर्तीजापुर मार्गावर आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Munawar Faruqui । अखेर त्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुन्नावर फारुकीने मागितली जाहीर माफी; पहा व्हिडीओ

महिला सायकलवरून जात असताना डंपरने महिलेला धडक दिली. यानंतर महिला डंपरच्या पुढच्या चाकाखाली आली आणि महिलेच्या दोन्ही पायांवर डंपरचे चाक गेले आहे. चालकाने अचानक डंपर वळवल्यामुळे महिला चाकाखाली आल्याचे बोलले जात आहे. सध्या या घटनेचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Ajit Pawar । ‘या’ दोन शहरात अजित पवार यांच्या जीवाला धोका; धक्कादायक माहिती आली समोर

Spread the love