Baramati News । बारामतीत जय पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचे मोठे विधान!

Jay Pawar And Ajit Pawar

Baramati News । बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते. २०१९ साली अजित पवार यांच्या मुलगा पार्थ पवार यांना आणि २०२४ साली पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे अजित पवारांना दुहेरी धक्का बसला. या पराभवांनंतर बारामती विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी तयारी सुरू केली आहे, अशी माहिती समोर आली होती. कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनलेली आणखी एक गोष्ट म्हणजे जय पवार (Jai Pawar) यांच्या उमेदवारीची मागणी होती.

Supriya Sule । “राखी पौर्णिमेला अजित पवारांना राखी बांधणार का”? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

पुण्यामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माध्यमांनी अजित पवारांना या संदर्भात विचारले असता, त्यांनी या विषयावर आपले मत स्पष्ट केले. ते म्हणाले, “लोकशाहीत शेवटी जनतेचा कौल महत्त्वाचा आहे. मला वैयक्तिकरित्या निवडणूक लढण्यात रस नाही. मी बारामतीत सात-आठ वेळा निवडणूक लढलो आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा आणि पक्ष संघटनेचा निर्णय जेव्हा होईल, तो आम्ही मान्य करू.”

Mahindra Thar Rocks 5-door SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले होते. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उमेदवारी दिली नव्हती पाहिजे, पण त्या वेळेस तसे झाले. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे काही झाले ते गेला वेळ परत येणार नाही, मात्र माझे मन सांगते की तसे घडायला नको होते.” त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ajit Pawar । अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “मी तर आव्हान दिलय…”

Spread the love