Manoj Jarange On Devendr Fadanvis । मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लटकवल्याचा आरोप केला आहे. “फडणवीस साहेबांचे गणित फेल होईल आणि त्यांना पश्चाताप करावा लागेल,” असा कडक इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांनी असेही म्हटले की, सत्ताधाऱ्यांनी गरीबांच्या हक्कांचा विचार करायचा ठरवलेला नाही, त्यामुळे गरीबांनी ठरवले आहे की त्यांना सत्तेतून हटवायचे. (Latest Marathi news )
जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, “येणाऱ्या 20 तारखेपर्यंत परिस्थिती खूप बदललेली दिसेल. फडणवीस साहेबांनी काही गणित बांधली आहेत, जी आता फेल होणार आहेत. त्यांना हलक्यात घेऊ नका.” जरांगे यांनी असा दावा केला की, फडणवीसांनी जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यांचे राजकीय गणित बिघडवले जाईल.
Baramati News । बारामतीत जय पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचे मोठे विधान!
जरांगे यांनी फडणवीसांना इशारा देत सांगितले की, “माझ्या राजकारणात आणू नका. मी राजकारणात आलो तर तुमचे सर्व गणित चुकवून टाकेन. माझ्या समाजाच्या हक्कांसाठी मी संघर्ष करणारच. माझा संघर्ष हा शेतकरी, गरीब, दलित, मुस्लिम, सर्व जाती धर्मांसाठी आहे.”
Supriya Sule । “राखी पौर्णिमेला अजित पवारांना राखी बांधणार का”? सुप्रिया सुळे म्हणाल्या..
छगन भुजबळ यांच्यावरही टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाजाला दोनशे वर्षांपासून ओबीसी आरक्षण मिळाले आहे, परंतु भुजबळ आता ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न चुकीच्या दिशेने नेत आहेत.” जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, “आता या लढाईत मागे हटण्याचा प्रश्नच नाही.”
Mahindra Thar Rocks 5-door SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये