Ajit Pawar On Ravi Rana । रवी राणा यांना अजित पवारांचा इशारा: “कुणी मायचा लाल बहिणींचे पैसे परत घेऊ शकत नाही”

Ajit Pawar On Ravi Rana

Ajit Pawar On Ravi Rana । अमरावतीमध्ये ‘लाडकी बहीण योजना’ (Lakdi Bahin Yojna ) वर केलेल्या विधानामुळे चर्चेत आलेले आमदार रवी राणा यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. रवि राणा यांनी जाहीर केले होते की, महिलांनी महायुतीला मतदान केले नाही, तर त्यांना मिळालेली 1500 रुपयांची रक्कम परत घेतली जाईल. या विधानावर प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी म्हटले की, “कुणीही मायचा लाल बहिणींचे पैसे परत घेऊ शकत नाही.”

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जि. प. प्राथमिक शाळा केंद्र उंडाळे येथे टायगर ग्रुप यांचा वतीने शैक्षणिक साहित्य वाटप!

हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेत बोलताना अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीतील नेत्यांना सुनावत स्पष्ट केले की, “माय-माऊलींनो, थोडा धीर धरा. महायुतीतील काही महाभाग चुकीची विधाने करत आहेत, पण तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम कुणीही परत घेऊ शकत नाही.”

Baramati News । बारामतीत जय पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचे मोठे विधान!

अजित पवारांच्या या वक्तव्याने रवी राणा यांच्यावर टीका होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यभरातून विरोधकांनी आणि महायुतीतील नेत्यांनीही रवी राणांच्या विधानाचा निषेध केला आहे. याआधीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणांना सुनावत स्पष्ट केले होते की, “भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही, आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाचा बापही परत घेऊ शकत नाही.”

Supriya Sule । “राखी पौर्णिमेला अजित पवारांना राखी बांधणार का”? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर, रवी राणा यांच्या विधानावर राजकीय वातावरण तापले असून, त्यांची विधानं महायुतीसाठी मोठा त्रासदायक ठरत आहेत. राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्याने या विधानाचे राजकीय परिणाम किती गंभीर होतील, हे आगामी काळात दिसेल.

Mahindra Thar Rocks 5-door SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Spread the love