Devendr fadanvis । तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्ती घेतो…; फडणवीसांच्या धक्कादायक विधानाने खळबळ

Devendr Fadanvis

Devendr fadanvis । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी स्पष्ट केलं की, मराठा आरक्षणाच्या निर्णयात कोणताही अडथळा आणल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर ते तत्काळ राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्ती घेतील.

Supriya Sule । “..त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत नाही” सुप्रिया सुळे यांचे सर्वात मोठे वक्तव्य

मुंबईतील (Mumbai) सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीत त्यांनी हे विधान केलं. पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरातील विविध प्रकल्पांबाबत झालेल्या चर्चेनंतर, त्यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. “मुख्यमंत्र्यांकडे राज्याचे सर्व अधिकार असतात, आणि मी त्यांच्या आदेशानुसार काम करतो. जर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी मराठा आरक्षणासंदर्भात अडथळा आणतो आहे, तर मी त्वरित राजीनामा देईन,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

Supriya Sule । “..त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत नाही” सुप्रिया सुळे यांचे सर्वात मोठे वक्तव्य

मनोज जरांगे यांनी यापूर्वी फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते, ज्यावर उत्तर देताना फडणवीसांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विचारावीत असं सुचवलं. या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. “फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत मोठं योगदान दिलं आहे आणि त्यांना मराठा विरोधी म्हणणं चुकीचं आहे,” असे शिंदे म्हणाले.

Ajit Pawar । माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या खात्यात रक्कम जमा, सांगलीतील महिला अजित पवारांना बांधणार सोन्याची राखी

Spread the love