Raj Thackeray: “…म्हणूनच गांधीजींसारखा”, गांधी जयंती निमित्त राज ठाकरेंनी शेअर केली फेसबुक पोस्ट

"…so like Gandhiji", shared Facebook post by Raj Thackeray on the occasion of Gandhi Jayanti

मुंबई : आज गांधी जयंती आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निमित्त फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी गांधींच्या (Gandhi) कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केलेत. सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.

मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू करायचाय? मिळतेय बंपर सबसिडी आणि कमवा बक्कळ पैसा

राज ठाकरेंनी गांधीजींचा फोटो त्यांच्या फेसबुकवर शेअर करत लिहिले की, महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं.

‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीला चार ते पाच हजारांचा दर

पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं. शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवाद. अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी गांधीजींबद्दल विचार व्यक्त केले आहे.

आजपासून सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं लागणार; शासननिर्णय जारी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *