Ladaki Bahin Yojana l लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय!

eknath shinde

Ladaki Bahin Yojana l मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एकापेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम बँकांनी विविध शुल्कांखाली कापल्याची समस्या उघडकीस आली आहे. योजनेतून जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत दोन कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असून, एक कोटीहून अधिक महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. तरीही, काही महिलांच्या खात्यातून शुल्क आणि दंडात्मक कपातीमुळे संपूर्ण रक्कम मिळू शकलेली नाही.

Nepal Bus Accident । महाराष्ट्रावर मोठी शोककळा! नेपाळमधील बस दुर्घटनेत जळगावातील 27 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिंदे यांचे महत्वाचे आदेश

यासंदर्भात राज्य सरकारने तत्काळ दखल घेतली आहे. महिला व बालविकास विभागाने सर्व बँकांना निर्देश दिले आहेत की, लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेत कोणतीही कपात केली जाऊ नये. बँकांना सूचित करण्यात आले आहे की, कर्ज थकीत असलेल्या महिलांच्या खात्यातून योजनेतून मिळालेल्या रकमेतून काही कपात केली जाऊ नये. याशिवाय, बंद झालेल्या खात्यांना पुनः सक्रिय करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Bombay High Court । ब्रेकिंग! महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद बेकायदा ठरला: मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या खात्यातील संपूर्ण रक्कम त्वरित उपलब्ध होईल. या उपाययोजनामुळे योजनेचा उद्देश सफल होईल आणि लाभार्थींना आवश्यक त्या आर्थिक सहाय्याची पूर्ण मात्रा मिळवता येईल.

Sharad pawar । शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उत्तर, म्हणाले “बदलापूरची घटना धक्कादायक त्याचं राजकारण..”

Spread the love