Pune Crime । पुण्यात एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. खराडी येथील नदीपात्रात पोलिसांना या तरुणीचे धड सापडले असून, तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे. मृत तरुणीचे वय अंदाजे 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
Dahi Handi festival | दहीहंडीचा उत्सव: मुंबईत भव्य कार्यक्रम आणि पुण्यात वाहतूक बदल
चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात हत्या आणि अन्य संबंधित आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे आणि हत्यारांचा मागोवा घेण्यासाठी तपास पथक नियुक्त केले आहे. या घटनेनंतर, परिसरातील नागरिकांमध्ये भिती आणि अस्वस्थता आहे. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून राज्यात चांगलेच चर्चेचं वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघड झाल्या होत्या, ज्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. पुण्यातील या नवीन घटनेने त्या चिंतेला अधिक धार दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तपासात गती आणली असून, मृत तरुणीच्या ओळखीची प्रक्रिया सुरू आहे. तपासाचा पुढील तपशील मिळाल्यावरच आरोपींच्या ओळखीबाबत अधिक माहिती मिळेल. नागरिकांनी पोलीस कार्यात सहकार्य करावे आणि अफवा पसरवण्यास टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Politics News । राजकारणात मोठा भूकंप? महायुतीचे बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?