Harshwardhan Patil । विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याचा राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. सध्या देखील एक मोठी बातमी समोर आली आहे, हर्षवर्धन पाटील यांनी दौंडमधील भाजप जिल्हा अधिवेशनाला दांडी मारली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
Harshvardhan Patil । राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका; हर्षवर्धन पाटलांचा गंभीर इशारा
दौंडमध्ये आयोजित जिल्हा अधिवेशनात स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते, परंतु हर्षवर्धन पाटील अनुपस्थित राहिले. भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे (Vasudev Kale) यांनी हर्षवर्धन पाटलांना निमंत्रण दिले होते, पण त्यांनी त्या निमंत्रणाला प्रतिसाद दिला नाही. यामुळे भाजपमधील तणाव अधिक तीव्र झाला आहे.
Sindhudurg News । छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी समोर आली मोठी अपडेट; चेतन पाटील यांना अटक
दरम्यान, हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाऊ शकतात, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात झालेल्या भेटीमुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. “हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते आहेत. इंदापूरमधील पेचावर चर्चा करून मार्ग काढू,” असे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील भाजपमधून बाहेर जातात का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
Congress । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा