Ajit Pawar । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या 60 जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे, पण त्यांच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र टीका केली आहे. वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, “अजितदादा 60 जागांवर आले, म्हणजे चुकलेल्या निर्णयाचा भोग फडत आहेत. आमच्याकडे असते तर सव्वाशे जागा लढवल्या असत्या,” असे ते म्हणाले. (Politics News )
Harshvardhan Patil । राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका; हर्षवर्धन पाटलांचा गंभीर इशारा
अजित पवारांनी सुरुवातीला 80 जागा लढवण्याचे व्यक्त केले होते. पण आता तो आकडा 60 वर आल्याने वडेट्टीवारांनी अजित पवारांच्या स्थितीची खिल्ली उडवली. वडेट्टीवार यांनी अजित पवारांची स्थिती वाईट असल्याचा दावा करत, “त्यांनी 60 जागा मिळवल्या आहेत. कदाचित त्यांची अवस्था अजून वाईट होईल. राष्ट्रवादीसोबत असते तर आम्ही आघाडीला 125 जागा लढल्या असत्या,” असे ते म्हणाले.
Harshvardhan Patil । राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका; हर्षवर्धन पाटलांचा गंभीर इशारा
वेट्टीवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या आंतरविरोधावरही भाष्य केले. “भाजप आणि शिंदे गटाला हिस्सेदार वाढवायचे नाही. त्यामुळे अजितदादांना दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
याशिवाय, वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर टीका केली, विशेषत: नागपुरातल्या अत्याचाराच्या घटनांवर. त्यांनी राज्य सरकारच्या खर्चाच्या योजनांवर चिडून, “राज्य सरकारने 4 कोटींच्या इव्हेंटवर खर्च केला आहे, परंतु महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे,” असे आरोप केले.
Mumbai News | धक्कादायक! दहीहंडी उत्सवात मुंबई आणि ठाण्यात 238 गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर