Pune Accident News । पुण्यातील पौड फाट्याजवळ रात्रीच्या उशिरा झालेल्या भीषण अपघातात मनसे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला आहे. येथील करिश्मा चौकात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने पीकअप गाडीने एकामागून एक वाहनांना धडक दिली. या अपघातात श्रीकांत अमराळे (Shrikant Amarale) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Hyundai । ह्युंदाईची ‘ही’ कार खरेदी करताल तर मिळेल 50 हजार रुपयापर्यंत सूट! वाचा संपूर्ण माहिती
प्राथमिक माहितीनुसार, आशिष पवार नावाच्या ड्रायव्हरने रात्री ११ च्या सुमारास करिश्मा चौकात गाड्या धडकवणे सुरू केले. त्याने दारूच्या नशेत असलेल्या अवस्थेत गाडीचं नियंत्रण गमावलं आणि अनेक वाहनांना जबरदस्त धडक दिली. अपघाताच्या वेळी श्रीकांत आणि गीतांजली अमराळे हे सिग्नलजवळ उभे होते. मद्यधुंद चालकाने त्यांच्यावर थेट गाडी चढवली, ज्यामुळे गीतांजली अमराळे यांचा जागीच मृत्यू झाला.
Baramati News । बारामतीच्या राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी!
या अपघाताची माहिती मिळताच तेथील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत टेम्पो थांबवून आरोपीला पकडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. याआधीही पुण्यातील कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाने मद्यपान करून भरधाव वेगाने कार चालवून अपघात केला होता, त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली आहे.