Politics News । भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संजयकाका पाटील यांनी अचानक पवार यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क सुरु झाले असून, त्यांच्या भाजप गटात राहण्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
Ajit Pawar । “मला मुख्यमंत्रिपद द्या…” अजित पवारांनी अमित शाहांकडे केली मागणी
संजयकाका पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangli Lok Sabha Constituency) दोन वेळा भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. मात्र, नुकत्याच पार झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Sharad Pawar | निवडणुकीआधी ‘तो’ पक्ष शरद पवारांपासून दुरावणार? राजकीय वर्तुळात खळबळ
संजयकाका पाटील यांनी भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत स्पष्ट केले की, त्यांनी शरद पवार यांची भेट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी घेतली आहे. “मी भाजपात समाधानी आहे आणि तुतारी हातात घेणार नाही. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाली नाही,” असे पाटील यांनी सांगितले.
Reliance Jio च्या वर्धापनदिनानिमित्त धमाकेदार ऑफर; 700 रुपयांपर्यंतचा फायदा
त्यांच्या भेटीनंतर अनेक लोकांनी त्यांना फोन करून या भेटीवर प्रतिक्रिया दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात सत्तासमीकरणांत होत असलेल्या बदलांचा आढावा घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुका किती महत्त्वाच्या ठरतील हे लक्षात घेतल्यास, या भेटीला राजकीय संकेत मानले जात आहेत.
Maratha Reservation । मनोज जरांगे यांना मोठा धक्का! मराठा नेत्यानेच सुरु केले विरोधात ठिय्या आंदोलन