Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! मनोज जरांगेंची प्रकृती जास्तच खालावली, संभाजीराजे घेणार भेट

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून, ते सध्या जालन्यातील अंतरवली सराटी येथे उपोषण करत आहेत. आज 23 सप्टेंबर रोजी त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. उपोषण स्थळावरून खाली उतरताना जरांगेंना भोवळ आली, त्यामुळे त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला.

Ajit Pawar । विरोधक लाडकी बहीण योजनेबद्दल खोटा प्रचार करत आहेत – अजित पवार

माहितीनुसार, संभाजीराजे छत्रपती आज अंतरवलीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. दोघांमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जरांगेंच्या प्रकृतीची चिंता त्यांच्या समर्थकांमध्ये वाढत आहे. डॉक्टरांच्या मते, जरांगेंना थकवा आणि अशक्तपणा जाणवत असून, रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने त्यांना उपचारांची आवश्यकता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना सलाईन लावण्यात आली होती, पण आता त्यांची तब्येत पुन्हा खालावली आहे.

Vasant More । “वसंत मोरे यांचा आक्रमक इशारा; त्या घटनेच्या निषेधार्थ थेट हातोडा चालवला?

उपोषण सुरू असतानाच, जालन्यातील वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी समाजाचे समन्वयक आमनेसामने आले होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला. ओबीसी कार्यकर्ते आणि अंतरवली सराटीतील मराठा कार्यकर्ते यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. वडीगोद्री येथे ओबीसीकडून उपोषण सुरू आहे, आणि त्याच्या अवघ्या 3 किमी अंतरावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चालू आहे.

Baramati News । “बारामतीत सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचे बॅनर; राजकीय चर्चांना उधाण

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, “आम्हाला मनोज जरांगे आणि ओबीसी दोघांच्याही तब्येतीची काळजी आहे. मात्र, जपून विधानं करणं आवश्यक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.” त्यामुळे सरकारच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar । “शरद पवारांचा मोठा इशारा; तीन पक्षांच्या जागावाटपाची प्रक्रिया 10 दिवसांत पूर्ण होईल”

Spread the love