Ajit Pawar | आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला पाठिंबा द्यायचा की स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या आघाडीला पाठिंबा द्यायचा हे महाराष्ट्रातील महिलांनी ठरवावे? असे आवाहन अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. माझी लाडकी बहिण योजना आणणारे महायुतीला पाठिंबा द्यायचा की स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या आघाडीला पाठिंबा द्यायचा ? ते महाराष्ट्रातील भगिनींनी ठरवावे . अजित पवार यांनी आपल्या एक्स हँडलवर माझी लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांनी केलेली टिका शेअर करताना अजित पवार म्हणाले की, काँग्रेसने माझी लाडकी बहिण योजना बंद करण्याची घोषणा केली आहे. महायुतीच्या विजयासाठी महिला मतदारांवर आशा ठेवून त्यांनी महाराष्ट्रातील आगामी निवडणुक महिलांच्या हाती असल्याचे यावेळी नमूद केले.
Havaman Andaj । महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट, हवामान विभागाने दिला अलर्ट; शाळांना सुट्टी जाहीर
उपमुख्यमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेत महिलांना १५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते आणि आतापर्यंत १.६ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेला राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असला तरी; या योजनेवरून राज्यातील विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास ही योजना बंद करण्यात येईल, असे विदर्भातील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी म्हटले आहे.
Ajit Pawar । अजित पवारांची जनसन्मान यात्रा चंदगड, कोल्हापुरात दाखल