Ajit Pawar । धक्कादायक बातमी! अजित पवार गटाच्या तालुकध्यक्षांचा अज्ञातांच्या हल्ल्यात मृत्यू

Ajit Pawar

Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसला आहे. भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी (Sachin Kurmi) यांच्यावर काल रात्री 12.30 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात कुर्मी गंभीर जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांचे पथक तात्काळ दाखल झाले असून, त्यांनी पंचनामा सुरू केला आहे.

Ladki Bahin Yojana l आनंदाची बातमी! ‘लाडकी बहीण’चा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार

भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे हा जीवघेणा हल्ला झाला. हल्ल्याच्या कारणांचा शोध घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर कुर्मी यांचा कोणाशी वाद वा शत्रुत्व होतं का, हे देखील तपासले जात आहे. हल्ल्यामागील व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Top Selling Bikes l भारतामध्ये ‘या’ आहेत टॉप-5 बाईक; वाचा डिटेल माहिती

सचिन कुर्मी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटावर मोठा आघात झाला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात भय आणि असुरक्षा वाढली आहे. तसेच, हल्ल्याच्या कारणांचा मागोवा घेण्यासाठी स्थानिक जनतेतही चिंतेचा विषय बनला आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासात वेगाने कारवाई सुरू केली आहे, परंतु अद्याप हल्लेखोरांना पकडण्यात आलेले नाही.

Sharad Pawar । शरद पवारांचे मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठे विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Spread the love