PM Kisan Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आज 5 ऑक्टोबरला 18 व्या हप्त्यातील 2000 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. याच बरोबर, महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत देखील 2000 रुपये मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना एकूण 4000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत, शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. पीएम किसान सन्मान योजनेची सुरुवात 2019 च्या निवडणुकीपूर्वी झाली होती. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे. महाराष्ट्र शासनाने देखील याच धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली होती.
Ajit Pawar । धक्कादायक बातमी! अजित पवार गटाच्या तालुकध्यक्षांचा अज्ञातांच्या हल्ल्यात मृत्यू
आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचा वितरणाचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये राज्यातील सुमारे 91.53 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन्ही योजनेतून मिळालेल्या 4000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे.