Ajit Pawar । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बारामतीतून निवडणूक न लढवण्याच्या चर्चांना त्यांनी एकदाच स्पष्ट उत्तर दिले आहे. “जसे कोकाटे यांचे सिन्नर तालुका हे कुटुंब आहे, तसं माझं बारामती हे कुटुंब आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे.
Suraj Chavan । सूरज चव्हाण याने केला सर्वात मोठा खुलासा; थेट म्हणाला, माझ्या घराला…
बारामतीत जनसन्मान यात्रेदरम्यान त्यांनी विरोधकांवर तिखट टीका केली. “रक्षाबंधनाला ओवाळणी दिली तर विरोधक म्हणतात की लवकर पैसे काढून घ्या. पण बहिणींना दिलेली ओवाळणी कोणी काढून घेतो का रे? यासाठी धमक असावी लागते. हे काम येड्या गबळाचे नाही,” असे अजित पवारांनी सांगितले. त्यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, “विरोधक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मला जी शिवीगाळ करायची ती करा, माझ्या अंगाला भोक पडत नाही,” असेही म्हटले.
Bjp । पुण्यात भाजपला मोठा धक्का; बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश
अजित पवार यांनी “लाडकी बहीण योजना” बंद करण्यासाठी विरोधकांनी कोर्टात गेलेल्या घटनाक्रमावर चुटकी घेतली. “तुमची योजना सुरू राहणार की बंद होणार, हे बटण कुठल दाबायचं यावर ठरणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या भाषणात त्यांनी नाशिकमधील जनतेला उद्देशून एक सकारात्मक संदेश दिला, “आम्ही कामाची माणसे आहोत, बिनकामाचे नाही.” त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी दर्शवत, “ही आपल्यासाठी महत्वाची निवडणूक असणार आहे,” असे सांगितले.