Baba Siddique Death News । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी वांद्रे पूर्व येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिद्दीकी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे, ज्यामध्ये गुरमैल सिंग, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर यांचा समावेश आहे. शिवकुमार, जो या हत्येत सामील असल्याचा संशय आहे, तो अद्याप फरार आहे.
पोलिसांनी शिवकुमारच्या शोधासाठी 15 पथके तयार केली असून त्याच्या गावी शोध सुरू आहे. शिवकुमार उत्तर प्रदेशचा असून त्याने पुण्यात कामासाठी येण्याचा उल्लेख केला होता. त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे. शिवकुमारच्या आईने बोलताना म्हटले की, “माझा मुलगा पुण्यात भंगार काम करायचा. मुंबईत तो काय करत होता, हे आम्हाला माहिती नाही.”
Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिग बॉस मराठी ५ चा विजेता सुरज चव्हाणशी साधला संवाद!
दुसऱ्या बाजूला, गुरमैल सिंगच्या आजीनंही या प्रकरणाबद्दल माहिती दिली. 2019 मध्ये हत्येच्या आरोपावर तुरुंगात असलेला सिंग तीन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो घरी आल्यानंतर अचानक निघून गेला, आणि तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
Sharad Pawar । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटाचा एक नेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर?
याचवेळी, प्रवीण लोणकर याला अटक करण्यात आली असून, तो शुभम लोणकरचा भाऊ आहे. या दोघांनीही धर्मराज कश्यप आणि शिवकुमार यांना हत्येच्या कटात सामील करून घेतले असल्याचा संशय आहे. या हत्याकांडामुळे मुंबईत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक शोधमोहीम सुरू केली आहे.