Bjp । निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सर्वात मोठा धक्का! अखेर ‘त्या’ बड्या नेत्याने केला शरद पवार गटात प्रवेश

BJP

Bjp । भाजपचे आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संदीप नाईक यांची भाजपमधून उमेदवारी मिळवण्याची प्रतीक्षा चालू होती, परंतु त्यांना अपेक्षित स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग निवडला. बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते सज्ज आहेत, आणि त्यांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो.

Ajit Pawar । पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात गाडीतुन 5 कोटी रुपये जप्त, अजित पवारांनी केला मोठा खुलासा; म्हणाले…

गणेश नाईक यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली असली तरी संदीप नाईक यांना स्थान न मिळाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. भाजपच्या एका कुटुंबातून एकाला उमेदवारी देण्याच्या धोरणामुळे संदीप यांना स्थान मिळाले नाही. या निर्णयामुळे भाजपच्या अंतर्गत वाद आणि नाराजगी वाढण्याची शक्यता आहे. संदीप नाईक यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईतील राजकारणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

Politics News । राजकीय घडामोडींना वेग! रात्री अचानक पंकजा मुंडे अजितदादांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर; नेमकं काय घडलं?

गणेश नाईक यांचे भाजपमध्ये महत्त्वाचे स्थान आहे, आणि त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे नवी मुंबई महापालिकेत अनेक नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु आता संदीप नाईकच्या निर्णयामुळे यामध्ये उलटफेर होऊ शकतो. शरद पवार गटात प्रवेश करून त्यांनी भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे.

Pune News | सर्वात मोठी बातमी! पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त

Spread the love