Supriya Sule । “कुटुंबाची मी माफी मागितली”, सुप्रिया सुळे यांचा मोठा खुलासा

Supriya Sule

Supriya Sule । महाराष्ट्रातील विधानसभेच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. आर. आर. पाटील यांच्याबद्दल अजित पवारांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्यामुळे सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी अजित पवारांच्या विधानाला ‘वेदनादायी’ म्हटलं असून, यामुळे आर. आर. पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांना झालेल्या दुःखाबद्दल त्यांनी माफी मागितली आहे.

Ajit Pawar । निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य!

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, “आजीत पवार यांचे वक्तव्य अस्वस्थ करणारे आहे. गेल्या माणसाबद्दल असे बोलणे अत्यंत अनुचित आहे.” त्यांनी यासंदर्भात पाटील कुटुंबाच्या वहिनींना फोन करून माफी मागितली आणि त्यांना या असंवेदनशीलतेमुळे किती दुःख झाले असेल याबद्दल चिंता व्यक्त केली. “राजकारणाच्या पातळीवर असं काही होणं आश्चर्यजनक आहे,” असं त्या म्हणाल्या.

Raj Thackeray l ब्रेकिंग! निवडणूक आयोगाकडून मनसेला सर्वात मोठा धक्का

या घटनामुळे राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे, विशेषतः सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संबंधांमध्ये. पाटील यांच्या योगदानाची व अनेकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांची स्मृती ठेवताना, अशा वक्तव्यांची गरज नाही, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची तब्येत खालवली

Spread the love